मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच महाराष्ट्र व मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. कोश्यारी म्हणाले कि, महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यानंतर मुंबई, ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावरून आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर जहरी टीका केली आहे.
राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ते म्हणाले कि, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीन वर्ष महाराष्ट्राचं मीठ खाल्लं आहे. पण त्यांनी त्याच मिठाशी नमकहरामी केली. कोश्यारी नावाचं पार्सल कुठून तरी पाठवलं आहे. ते जर राज्यपालपदाच्या खुर्चीचा आदर राखत नसेल, मराठी माणसाचा अपमान करत असेल तर ते पार्सल घरी किंवा तुरुंगात पाठवा. ते कुठे पाठवायचं हा निर्णय सरकारने घ्यावा. कोश्यारी महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातील जातीपातींमध्ये आणि धर्मांमध्ये आग लावण्याचे काम करत आहेत.”, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
तसेच पुढे उद्धव ठाकरे असेही म्हणाले, “कोश्यारींनी यापूर्वीही सावित्रीबाई फुलेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होत. त्यांनी आतापर्यंत केलेली विधानं बघता महाराष्ट्राच्याच नशिबी अशी माणसं का येतात हा प्रश्न मला पडतो.” तसेच राज्यपालांनी केलेलं वक्तव्य हे अनावधानाने आलं नसून यामागे दिल्लीतलं राजकारण असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.
संजय राऊतांची प्रतिक्रिया
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील याआधी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली होती. ते म्हणाले कि, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे.. ऐका .. ऐका…, असं राऊत ट्विटमध्ये म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या:
- Nana Patole | राज्यपालांनी मराठी बांधवांची माफी मागावी – नाना पटोले
- Uddhav Thackeray । राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय – उद्धव ठाकरे
- Supriya Sule : “ज्या राज्यातून आले आहेत तिथे यांना परत पाठवा”, सुप्रिया सुळे राज्यपालांवर संतापल्या!
- Chhagan Bhujbal | “उगाचंच गुजराती, राजस्थानी आणि मराठी वाद उकरून काढू नये”; छगन भुजबळांचा राज्यपालांना सल्ला
- Sanjay Raut | ज्या पद्धतीने राज्यपालांनी वक्तव्य केलं, तो महाराष्ट्राचा अपमान आहे – संजय राऊत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<