Uddhav Thackeray | बुलढाणा : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथी नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बुलढाण्यातील चिखली मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याकडे उद्धव ठाकरे गटाचे विशेष लक्ष आहे. याच महिन्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी दोन्ही बंडखोर आमदार आणि खासदारांवर चांगलीच तोफ डागली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे बुलढाण्यात येत असून, ते कोणावर आपले टीकास्त्र सोडतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
चिखली येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शेतकरी मेळावा घेणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व होते. एक खासदार आणि दोन आमदार शिवसेनेचे होते. मात्र खासदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav), आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि आमदार संजय रायमुलकर (Sanjay Raimulkar) हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेला महत्व प्राप्त झाले आहे.
एकनाथ शिंदेंचा आज आमदारांसह गुवाहाटी दौरा-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्री आणि समर्थक आमदारांसह आज गुवाहाटी साठी रवाना झाले आहेत. गुवाहाटी महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाचे केंद्र बिंदू मानले जात आहे. तेथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात ते विशेष पूजाविधी करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विशेष विमान 200 सदस्यीय शिष्टमंडळ घेऊन मुंबईहून गुवाहाटीला रवाना झाले आहे. शिंदे आणि त्यांचे सहकारी रविवारी मुंबईत परतण्याची शक्यता आहे. शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह जून 2022 मध्ये सुरतमार्गे गुवाहाटी येथे शिवसेनेविरुद्ध बंड करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गेले होते. आता राज्यात त्यांचे सरकार असून ते मुख्यमंत्री झाले असल्याने ते पुन्हा गुवाहाटीला जाऊन देवीचे दर्शन घेत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेणार आहेत.
100 खोल्या बुक-
शिंदे आणि त्यांचे आमदार गुवाहाटीतील एका आलिशान हॉटेलमध्ये आठवडाभराहून अधिक काळ थांबले होते. यावेळीही शिंदे आणि त्यांच्या आमदारांसाठी हॉटेलमध्ये 100 खोल्या बुक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Cancer Pain | कॅन्सरमध्ये शरीरातील ‘या’ भागांमध्ये होतात वेदना
- Avatar: The Way of Water | ‘अवतार:द वे ऑफ वॉटर’चा भारतात धुमाकूळ, रिलीजपूर्वी झाली हजारो टिकिटांची बुकिंग
- Shreyas Iyer | न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यरने केला ‘हा’ नवा विक्रम
- National Milk Day | गाई-म्हशीच्या दुधापेक्षा जास्त फायदेशीर आहे शेळीचे दूध, जाणून घ्या फायदे
- Washington Sundar | वॉशिंग्टन सुंदरने न्युझीलँडच्या मैदानावर केला पराक्रम, सुरेश रैना आणि कपिल देव यांचे तोडले रेकॉर्ड