विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं दौऱ्याने उत्तर !

uddhav thakrey and shetkari

मुंबई : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.

आज व उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काल बारामती व सोलापूर भागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. तर, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील बारामती पासून नुकसानग्रस्त भागाचा तीन दिवसांचा दौरा सुरु करून पुढे ते उस्मानाबादपर्यंत आढावा दौरा करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून राज्याचा दौरा करावा अशी मागणी जोर धरू लागली होती.

विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर घरी बसून राज्य हाकण्यावरून टीका देखील केली. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेला कृतीतून उत्तर दिलं आहे. उद्या (सोमवार) ते सोलापूर जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा करतील. सोमवारी सकाळी ते मुंबईहुन सोलापूरला ते विमानाने पोहचतील. तेथून सकाळी साडेनऊ वाजता अक्कलकोट तालुक्यातील गावांचा मोटारीने प्रवास करून पाहणी करतील. यानंतर दुपारी तीननंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ते मुंबईला परततील.

महत्वाच्या बातम्या-