Share

Uddhav Thackeray | “बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत?”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

Uddhav Thackeray | मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सीमा वादावरुन मुख्यमंत्री (Cheif Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ठाकरेंनी शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्यावर देखील लक्ष्य केलं. काही दिवसांपुर्वी एकनाथ शिंदे ४० आमदारांसोबत गुवाहाटीला कमाख्या देवीचं दर्शन घ्यायला गेले होते.

मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावरून आले आहेत. आता त्यांनी बेळगाव महाराष्ट्रात येण्याचा नवस करण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जावं, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. कर्नाटककडून महाराष्ट्रावर कुरघोडी करण्यात येत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्र शब्दही काढला नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

तसेच, महाराष्ट्राचे प्रश्न राहिले बाजूला. कर्नाटकाने आपल्या तलावात पाणी सोडलंय हे सत्तेच्या पाण्यात गटांगळ्या घालत आहेत. याच नेभळटपणाविरोधात सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, असं देखील ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या अखेरच्या दिवसात अयोध्येत महाराष्ट्र भवन करणार असल्याची घोषणा मी केली होती. त्या घोषणेला या लोकांनी स्थिगिती दिली असेल तर माहीत नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Uddhav Thackeray | मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सीमा वादावरुन मुख्यमंत्री (Cheif Minister) एकनाथ शिंदे (Eknath …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now