Share

Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचा सवाल! म्हणाले, “सीमावादाचा प्रश्न उपस्थित करणार का?”

Uddhav Thackeray | नागपूर : उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत रविवारी रात्री नागपुरात पोहोचले. आज उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ताशेरे ओढले. उद्धव ठाकरे यांनी सभागृहात कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत सीमावादाचा प्रश्न उपस्थित करणार का?, असा सवाल ठाकरे यांची उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. “काही जण म्हणतात की तुम्ही आम्हाला सीमा प्रश्नाबाबत काय सांगता? आम्ही या लढ्यात काठ्या खाल्ल्या आहेत. पण तुम्ही जेव्हा या लढ्यात काठ्या खल्ल्या तेव्हा तुम्ही शिवसेनेमध्ये होतात. आता पक्षा बदलला तर शांत बसायचं असा त्याचा अर्थ होत नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाल, मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देणार आहे. विरोधी पक्षात आल्यावर पेन ड्राईव्ह द्यावे लागतात. या पेन ड्राईव्हमध्ये सत्तरीच्या दशकात महाराष्ट्र सरकारने ‘केस फॉर जस्टिस’ ही फिल्म केली होती. 18व्या शतकापासून कर्नाटकात लोक मराठी भाषा कसे वापरत आहेत. शाळा, कामकाज, संस्था यांचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Uddhav Thackeray | नागपूर : उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत रविवारी रात्री नागपुरात पोहोचले. आज उद्धव ठाकरे यांनी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nagpur Politics

Join WhatsApp

Join Now