‘सरकार बदलंल मात्र यंत्रणा तीच असल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत’

टीम महाराष्ट्र देशा : सरकार बदलंल मात्र यंत्रणा तीच असल्यामुळे योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेने शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केले. त्यावेळी बुधवारी 17 जुलैला शिवसेनेचा पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले. हा शेतकर्‍यांचा मोर्चा नसेल, हा शेतकर्‍यांसाठी मोर्चा असेल. हा मोर्चा एका कंपनीवर जाईल केवळ प्रतीक म्हणून, बाकी कंपन्यांवर आमची शिष्टमंडळे जातील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

शेतकऱ्यांना प्रत्येकवेळा व्यथा मांडण्यासाठी मुंबईत यावं लागतं हे बरोबर नाही. शेतकऱ्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी बुधवारी 17 जुलैला शिवसेनेना पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढत आहे. विमा कंपन्यांना सरकारी भाषा कळत नसेल तर शिवसेना आमच्या भाषेत समजावेल, असेही ठाकरे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर सरकार बदलंल मात्र यंत्रणा तीच असल्यामुळे योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाही असे म्हणत मी यंत्रणा बदलण्याचे म्हणत नाही, मी सुधारण्याबाबत बोलत आहे, असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर ज्या बँकांनी कर्ज दिलं आहे, आणि कर्जमाफी झालेली आहे अशा शेतकऱ्यांची नावे बँकांच्या दारावर लावलीच पाहिजे. कृषी आयोग स्वतंत्र असावा, त्याला अधिकार असावेत ही आमची मागणी आहे, असेही ठाकरे यांनी म्हंटले.

Loading...

पिकविमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भातील सगळी प्रकरणे निकाली काढा. शेतकऱ्यांना नडाल तर धडा शिकवल्या जाईल असेही त्यांनी म्हंटले. शिवसेना सदैव आपल्यासोबत आहे हे वचन मी शेतकऱ्यांना देतो. असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

Loading...