शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर ; पिकविमा कंपन्यांना वेठीस धरणार

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. बुधवारी 17 जुलैला शिवसेनेना पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढणार आहे. असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading...

शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या पिकविमा प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. येत्या 17 जुलैला पिकविमा कंपन्यांविरोधात शिवसेना वांद्रे कुर्ला संकुलात इशारा मोर्चा काढणार आहे. शेतकऱ्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा शेतकर्‍यांचा नसून शेतकर्‍यांसाठी असणार आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर हा मोर्चा एका कंपनीवर जाईल केवळ प्रतीक म्हणून, बाकी कंपन्यांवर आमची शिष्टमंडळे जातील, असेही त्यांनी म्हंटले. तसेच जर विमा कंपन्यांना सरकारी भाषा कळत नसेल तर शिवसेना आमच्या भाषेत समजावेल. पिकविमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भातील सगळी प्रकरणे निकाली काढावीत असेही ठाकरे यांनी म्हंटले.

याचबरोबर शिवसेना सदैव आपल्यासोबत आहे हे वचन मी शेतकऱ्यांना देतो असे म्हणत शेतकऱ्यांना नडाल तर धडा शिकवल्या जाईल असा इशाराही पिकविमा कंपन्यांना दिला.Loading…


Loading…

Loading...