मस्तवाल सत्ताधाऱ्यांना लोकांनी झुकवल; उद्धव ठाकरे

udhav thackeray

केंद्र सरकारने जीएसटी दरात केलेल्या कपातीबद्दल अभिनंदन करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारमधील लोक जीएसटीतील दराच्या कपातीला जनतेला दिलासा असल्याच म्हणतात मात्र हा दिलासा नसून तो नाईलाज असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच दरात कपात जरी केली असली तरी एवढे दिवस वसूल केलेला जीएसटी परत करणार का असा सवाल त्यांनी केला आहे. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सत्ताधारी कितीही मस्तवाल असला तरी जनता त्यांची मस्ती उतरवू शकते हे यावरूनच दिसून येत असल्याचही ते म्हणाले आहेत. राज्य सध्या अंधारत गेले असून कोळशाचा तुटवडा होणार हे माहित असतानाही त्याची सोय का गेली नाही? तसेच तत्वता भारनियम असे शब्द वापरून जनतेची फसवणूक करू नका म्हणत राज्यातील भारनियमन तातडीने थांबवण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...