मुंबई: महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार डगमगताना दिसून येत आहे. त्यात सध्या यंदाचा विठ्ठल पूजेचा मान कोणाला मिळणार या मुद्द्यावर चर्चा रंगत आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) की उद्धव ठाकरे अशा चर्चांना उधान येत आहे.
आषाढी एकादशीच्या वारीला सुरुवात झाली आहे. त्यात राज्यातील राजकारणात सत्ता परिवर्तनाचे वारे वाहताना दिसून येत आहेत. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार बुधवारी पहाटे चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे पोहोचले. महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सुरतहून गुवाहाटी गाठल्यानंतर आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. मात्र, महाराष्ट्राचे ४१ बंडखोर आमदार गुवाहाटीला पोहोचले असून एका आलिशान हॉटेलमध्ये थांबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यापैकी ३४ शिवसेनेचे तर सात अपक्ष आमदार आहेत.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी पक्षाविरोधात बंड करून सुरतमधील हॉटेल गाठल्यानंतर मंगळवारी पक्षाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये हलवले. पक्षाच्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आमदारांचे अपहरण होण्याच्या भीतीने हे कृत्य करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Chhagan Bhujbal : पंतप्रधान देहूत संत तुकारामांच्या भेटीला आले अन् एकनाथाला घेऊन गेले – छगन भुजबळ
- Sanjay Raut: …मग बघू कोणाकडे किती लोकं आहेत – संजय राऊत
- Sanjay Raut tweet : विषय संपला! संजय राऊतांचे ट्वीट, “विधान सभा बरखास्तीच्या दिशेने…”
- Maharashtra Political Crisis : कॉंग्रेसने सरकार वाचवण्याची जबाबदारी कमलनाथ यांच्यावर सोपवली
- Sachin Sawant : ‘त्या’ प्रश्नावर संघाची जी अवस्था होते ती आपली होता कामा नये; सचिन सावंत यांचे सूचक ट्वीट