राम मंदिरासाठी आंदोलन करण्यापेक्षा सरकार पाडा,उद्धव ठाकरेंचा संघाला सल्ला

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेमुळेच गेल्या चार वर्षांपासून बासनात गुंडाळला गेलेला राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. आता संघालाही राम मंदिरासाठी आंदोलनाची गरज वाटत असेल तर तुम्ही हे सरकार खाली का खेचत नाही, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारला आहे. शिवसेना भवनात शुक्रवारी सकाळी आमदार, संपर्क नेते, जिल्हा पदाधिकारी यांची बैठक पार पडली. बैठकीत मार्गदर्शन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीकास्त्र सोडले.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेहनतीमुळेच केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्याचे सांगिततले जाते. पण सत्तेत आल्यावर संघासाठी महत्त्वाचे असलेले राम मंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा हे मुद्दे बाजूला पडले. पण आता शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करतात धडपड सुरु झाली. राम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अजूनही आंदोलनाची गरज वाटते. बहुमत असलेल्या पक्षाचे सरकार सत्तेत असताना आंदोलनाची गरज वाटत असेल तर तुम्ही सरकारला खाली का खेचत नाही?