‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…

सिंधुदुर्ग : सामनातील नाणारसंदर्भातील जाहिरातीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावर नाणारची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दोन दिवसीय सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. ‘शिवसेनेचे धोरण आणि निर्णय मी ठरवतो. ते ‘सामना’तून मांडले जातात. जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाहीत, हे मी नमूद करु इच्छितो. जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली असं होत नाही. म्हणून मी म्हणतो, अशा जाहिराती दररोज येत असतात, हा विषय संपला’ असं म्हणत ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात छापून आलेल्या नाणारच्या जाहिरातीविषयीच्या ठाकरे म्हणाले.

Loading...

तसेच ‘सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याची आढावा बैठक झाली. आरोग्य, रस्ते, शेती, स्थानिक शेतकऱ्यांचे मुद्दे समोर आलेत. शक्य तितक्या मुद्द्यांवर तात्काळ मदतीचे आदेश दिलेत. सर्व स्थानिक मुद्द मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सिंधुरत्न विकास योजना आखली आहे. आमदारांकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे,’ अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

दरम्यान, ‘एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. दलित बांधवांशी संबंधित जो विषय आहे तो भीमा कोरेगावचा आहे. या प्रकरणाचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही,’ असे ठाकरे म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं