मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार: उद्धव ठाकरे

मुंबई: ‘महापौर शिवसेनेचाच होणार, पण दगा फटका होता कामा नये. प्रलोभने-अमिषांना बळी पडू नका.’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधला.

 

‘त्यांच्याकडे केंद्रात आणि राज्यातल्या सत्तेची ताकद होती. शिवसैनिक वडापाव, भाकरी खाऊन रस्त्यावर लढला. हे यश शिवसैनिकांच्या ताकदी शिवाय कधीही शक्य नव्हते. बाळासाहेबांनी दिलेल्या शपथेच्या आणि निष्ठेच्या शिकवणीवर, निखाऱ्यांवर शिवसैनिक वाटचाल करतो आहे.’

‘11 लाख मतदारांची नावे यादीतून गायब झाली नसती तर, आज चित्र वेगळेच असते. आपल्या अनेक जागा अगदी थोड्या मतांच्या फरकाने गेल्या. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत नवीन नगरसेवकांना महापौर मतदानाच्या दिवशी मतदानाची पद्धत कशी असते याची माहिती दिली गेली.

You might also like
Comments
Loading...