इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी कशी? -उद्धव ठाकरे 

घोडेबाजारीचा आरोप गाढवांनी करु नये:ठाकरे 

मुंबई : इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी, असं कसं, असा टोला लगावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधला आहे. घोडेबाजारीचा आरोप गाढवांनी करु नये अशी टीका करत  तीन कोटी रुपये मोजून नगरसेवक विकत घेतल्याचा सनसनाटी आरोप सोमय्यांनी केला होता त्याचा देखील शेलक्या शब्दात समाचार ठाकरे यांनी घेतला आहे .

अर्चना भालेराव (वॉर्ड 126), परमेश्वर कदम (वॉर्ड 133), अश्विनी मतेकर (वॉर्ड 156), दिलीप लांडे (वॉर्ड 163), हर्षल मोरे  (वॉर्ड 189), दत्ताराम नरवणकर यांनी सेनाप्रवेश केला. मुंबईतील ‘मातोश्री’ या निवासस्थानावर त्यांनी हे शिवबंधन बांधलं. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सहा जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत आल्याचं उद्धव म्हणाले.

.कोणाला फटका द्यायचा म्हणून त्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत घेतलं नाही, त्यांनीच शिवसेनाप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. एका दिवसात सेना इतकी जमवाजमव करत असेल, तर आमच्या ताकदीचा अंदाज आलाच असेल, अशी मिश्कील टिपणीही उद्धव ठाकरेंनी केली.

You might also like
Comments
Loading...