उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील निरव मोदी; नितेश राणे यांची कणखर टीका

मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील निरव मोदी आहेत. अशी कणखर टीका कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

शिवसेनेचे सर्वात जास्त आमदार कोकणातूनच आहेत तरी सुद्धा शिवसेनेने कोकणवासियांच्या पाठित खंजिर खुपसण्याचे काम केले आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी जनतेला फसवण हेच काम महाराष्ट्र आणि कोकणातील माणसांवर करत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे.

नानार प्रकल्पावरून वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणात उडी घेतली असून शिवसेना-भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

You might also like
Comments
Loading...