मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. पण ज्यांनी मी नको आहे, त्यांनी तसे येऊन सांगावे किंवा फोनवर बोलावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले आहे.
त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा सोडले आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ला जय महाराष्ट्र केला आहे. ठाकरे हे आता मातोश्रीला जाणार आहेत.
वर्षा बाहेर अनेक कार्यकर्ते जमले आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुष्प वर्षाव करण्यात आला. कार्यकर्ते हे भावनिक झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वी लाईव्ह येत आपल्या मुख्यमंत्रीपदाबाबत खुलासा केला आहे. मला कोणताही मोह नाही, मी राजीनामा द्यायाल तयार आहे. परंतु, ज्यांना मी नकोय त्यांनी माझ्या समोर येऊन बोला. समोर येऊन बोललात तर संध्याकाळी देखील राजीनामा देतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुखपद देखील सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद आहे. पण समोर येऊन सांगा… मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे, असं ते लाईव्हमध्ये बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :