मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली होती. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत आपल्या मुख्यमंत्रीपदाबाबत खुलासा केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, मला कोणताही मोह नाही, मी राजीनामा द्यायाल तयार आहे. परंतु, ज्यांना मी नकोय त्यांनी माझ्या समोर येऊन बोला. समोर येऊन बोललात तर संध्याकाळी देखील राजीनामा देतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुखपद देखील सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद आहे. पण समोर येऊन सांगा… मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे.
तसेच पुढे ते म्हणाले कि, काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले असते की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर ठिक आहे. मला दु:ख झाले. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं. तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको,असं तोंडावर सांगावं. ज्यांना मी नकोय त्यांनी माझ्या समोर येऊन बोला. नाहीतर मी राजीनामा देणार नाही, आव्हानाला सामोरे जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :