मुंबई : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जुलैमध्ये घेतलेली ‘अनलॉक मुलाखत’ प्रचंड गाजली होती. यानंतर या मुलाखतीवर भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुद्धा सोडलं होतं. आता, या सरकारला वर्षपूर्ती होत आहे. याच वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.
ठाकरे म्हणाले, सध्या फक्त हात धुतोय; जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन. काहींना डोक्याचे विकार झालेत. त्यांच्यावर उपचार करावे लागतील. मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही! सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत! असा दणकाच त्यांनी सुरुवातीला दिला.
दरम्यान, त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं आहे. मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावरच प्रश्न निर्माण केला होता. या मुलाखतीतून देखील त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत.’ असा टोला त्यांनी राज्यपालांना व भाजपला नाव न घेता लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाण्यात पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर मनसेचा राडा; मनसे नेते ताब्यात
- लँडलाइन फोनवरून मोबाइलवर कॉल करताना आता ‘हे’ करणे अनिवार्य असेल
- वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू : वडेट्टीवार
- ‘तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू’ ईडीच्या कारवाईनंतर ठाकरेंचा थेट इशारा
- ‘सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत’