Uddhav Thackeray | मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १०वा स्मृतीदिन आहे. यानिमीत्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाला जावून अभिवादन केलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला.
यादरम्यान, बाळासाहेबांचा आजचा स्मृतीदिन मला वेगळा वाटतो. त्याला कारण आहे. कारण काही जणांना दहा वर्ष लागली शिवसेनाप्रमुखांनंतर शिवसेना प्रमुख कोण हे समजायला. अनेक शिवसेना प्रेमी आहेत. शिवसेना प्रमुख प्रेमी आहेत. त्यांनी सुद्धा त्यांचं प्रेम आणि भावना व्यक्त करायला हरकत नाहीये. पण ते व्यक्त करताना त्याचा बाजार होऊ नये ही भावना आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कृतीतूनही विचार व्यक्त होतात. कृती नसेल तर तो विचार विचार राहत नाही. तो बाजार राहतो. म्हणून शिवसेना प्रमुखांच्या नावाचा बाजार कुणी मांडू नये. त्यांच्या भावना, श्रद्धा, प्रेम समजू शकतो. पण तुम्ही साजेसं काम करा, असा टोला त्यांनी लगावला.
सावरकरांचा मुद्दा उपस्थित केला हे बरं झालं. सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. नितांत आदर आहे. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता. अशा मातृसंस्थांच्या पिल्लांनी आम्हाला प्रश्न विचारावा हे दुर्देव आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा. बाष्कळपणा बंद करा. आपल्या मातृसंस्थेचा स्वातंत्र्य लढयात भाग नव्हता त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. असं सांगतानाच निजामांच्या काळात हिंदूंवर अत्याचार होत होते. त्यावेळी तुमची मातृसंस्था कुठे होती? त्यांनी हिंदूंवरील किती अत्याचार थांबवले? असा सवालच त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Rahul Gandhi PC | मराठीत प्रश्न विचारा, मराठी समजते – राहुल गांधी
- Uddhav Thackeray | “…अशा मातृसंस्थांच्या पिल्लानी आम्हाला सावरकरांविषयी प्रश्न विचारू नये”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
- ICC Ranks | टी 20 मध्ये पुन्हा भारतीय संघ आघाडीवर, विश्वचषक जिंकून इंग्लंड भारताच्या मागे
- Shinde vs Thackeray | “आधी मातोश्री पवित्र करावी” ; शिंदे गटातील आमदाराचा घणाघात
- Sanjay Raut | “राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न दिला, मग…”, संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल