fbpx

उद्धव ठाकरे लाचारी पत्करून सरकारमध्ये

टीम महाराष्ट्र देशा -आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर आसूड घेऊन फिरत होते. कर्जमाफी देता की जाता असं म्हणत होते. आता लाचारी पत्करून सरकारमध्ये असल्याने त्यांना काही देता पण येत नाही आणि जाता पण येत नाही अशी परिस्थिती आली असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ठाकरे यांच्यावर केली. घनसावंगी येथे राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेमध्ये ते बोलत होते.

धनंजय मुंडे म्हणले की, ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना साले म्हणतात. आंदोलनं चिरडण्यासाठी शेतकऱ्यांना पायाखाली गोळी मारायला हवी होती अशी वाच्यता करतात. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरून दाखवाच नाही लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली तर सांगा.’

महाराष्ट्र दुष्काळात होरपळू लागलांय, गावागावात टॅंकरची सुविधाही केलेली नाही. आणि जलयुक्त शिवार योजनेची जाहिरातबाजी तर अशी केली आहे की राज्याबाहेरील लोकांना वाटतंय महाराष्ट्र पाण्याखाली आहे. खरंय, यांच्या राज्यात महाराष्ट्राची प्रगती पाण्याखालीच गेली आहे,असेही मुंडे यावेळी म्हणले.