मुंबई : ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) यांचे ४ जाने. रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रासह सर्व देश शोकसागरात बुडाला.
सिंधुताई यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले. ज्यामध्ये एका कार्यक्रमात बोलत असतांना सिंधुताई म्हणाल्या होत्या की,’माझं पुस्तक दहावीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे. पण महाराष्ट्रात नाही याचे कारण महाराष्ट्रात मोठ व्हायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं आणि मेलेला माणूसच मोठा होतो. मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात तो महाराष्ट्र आहे हे दु:ख आहे’, अशी शोकांतिका आपल्या राज्याची असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी या गोष्टीची दखल घेतली असून, तसे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.
दरम्यान, सिंधुताई यांच्या कार्याची दखल घेण्याची सुचना शालेय शिक्षण विभागाला देण्यात आली असून यासांदर्भात एक पत्र शालेय शिक्षण विभागांच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे सिंधुताईंची अपूर्ण इच्छा आता पुर्ण होणार असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर पेडणेकरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…
- “किरीट सोमय्या हळूच कुठलीतरी गोळी खातात, ती फस्ट्रेशनची आहे का?”, किशोरी पेडणेकरांचा सवाल
- सावधान! आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिश्रण असलेला ‘डेल्टाक्रॉन’ आलाय
- गोव्यात काँग्रेसच्या सक्षम नेतृत्वाअभावी १७ चे २ आमदार झाले-संजय राऊत
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय ते आम्ही यापूर्वीच केलेले”, ममतांचे मोदींसमोरच विधान
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<