उद्धव ठाकरे न्यायव्यवस्था, राज्य सरकार आणि प्रशासनावर बरसले.

udhav thakare

टीम महाराष्ट्र देशा : २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हिंदुना चांंगले दिवस येतील असा समज समाजात पसरत होता. मात्र आजही बंधनं फक्त हिंदूंच्या सण-उत्सवांवरच येत आहेत. गिरगावात पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं गणेशोत्सवाचा मंडप उध्वस्त केला. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ‘सामना’मधून फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सांगली, जळगाव महापालिका विजयाची धुंदी उतरली असेल तर गणपती उत्सवाच्या बाबतीत सुरू असलेल्या मोगलाईची दखल राज्याच्या लाडक्या, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल.

महापालिकेच्या एका टिनपाट वॉर्ड ऑफिसरनं गिरगावातील गणेशोत्सवाचा मंडप उखडताच त्याच्या कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी दणका दिला आहे. थोडी ठोकाठोक झाली, पण श्री गणरायाचे आगमन सुकर व्हावं व हिंदुत्वाचा मान राहावा म्हणून शिवसैनिकांनी याप्रकरणी नवे खटले अंगावर घेतले आहेत. गणेशोत्सवात, विशेषतः खास हिंदूंच्याच सण-उत्सवात न्यायालय, प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे असे अडथळे येत असतील तर या देशाचे भविष्य काय?’ असा सवाल उद्धव यांनी उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

जणू न्यायालयांच्या टेबलावरील सर्व प्रकरणं संपली आहेत व हिंदूंचे, सण-उत्सव साजरे करणाऱ्या आयोजकांचे कान उपटणं व त्यांना फर्मानं सोडणं इतकंच काम उरलं आहे. जे न्यायालय हिंदूंच्या राममंदिराबाबत गेल्या पंचवीस वर्षांत निर्णय देऊ शकलं नाही, जे न्यायालय महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नाबाबत निर्णय देऊन कानडी जोखडाखालील मराठी बांधवांना न्याय देऊ शकत नाही ते न्यायालय हिंदू सण-उत्सवाबाबत मार्गदर्शक नियमावली तयार करतं व त्या नियमावलीची भेंडोळी नाचवत नोकरशाही गणेशोत्सवाला आडवी जाते. हा एक प्रकारे ‘ऍट्रॉसिटी’चाच प्रकार आहे, पण हिंदूंच्या सण- उत्सवांवरील अत्याचार तुमच्या त्या ऍट्रॉसिटी कायद्यात मोडत नाहीत. त्यामुळे देवाधिराज गणरायही मुकाटपणे हे अत्याचार सहन करतात,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे न्यायव्यवस्था, राज्य सरकार आणि प्रशासनावर बरसले.

शिस्त काय असते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिका : काँग्रेस नेते

राज्यातील पोलीस खाते नेमकं करतंय काय? ; उद्धव ठाकरे