Uddhav Thackeray । मुंबई : अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची चर्चा सुरु असतानाच रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याआधी गुलाबराव पाटील आणि संभाजी भिडे यांची वक्तव्यं देखील चर्चेत होती. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. आता अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यांवरून उद्धव ठाकरे गटानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. ‘सामना’मधील अग्रलेखातून ठाकरे गटानं शिंदे सरकारवर हल्ला चढवला आहे.
सामनात म्हंटलंय की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रशांत दामलेंच्या एका नाट्य प्रयोगासाठी गेले. त्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘या नाटकाचे काय घेऊन बसलात? आम्ही महाराष्ट्रात तीन महिन्यांपूर्वी एक महानाट्य घडवलं. त्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले. त्या महानाट्याचे पडसाद आजही उमटत आहेत.
’’मुख्यमंत्री बरोबर बोलले. त्यांच्या महानाट्यातील अब्दुल सत्तार, गुलाब पाटलांसारख्या ‘नट’ मंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून महाराष्ट्राची सुसंस्कृत रसिक जनता जोडेफेक करू लागली आहे. हे कसले महानाट्य? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर टीका करताना त्यांचा ‘नटी’ असा उल्लेख केला. यावरून सामनाच्या अग्रलेखातून त्यांचाही समाचार घेण्यात आला आहे. “जळगावचे खोकेबाज ‘टाईट’ मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचाही फक्त तोलच गेला नाही तर ते झोकांड्या जाताना दिसत आहेत. शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख या खोकेबाज गुलाबरावाने ‘नटी’ म्हणून केला. ‘नटी’ हा शब्द त्यांनी कोणत्या अर्थाने वापरला?” असा सवालही केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “…त्यामुळे शिरसाट हे ठाकरे गटात परतणार”, सुषमा अंधारेंचा दावा
- Kapil Patil । “…अन्यथा तिरंग्यावर एक दिवस चंद्र दिसेल”; कपिल पाटलांचं वादग्रस्त विधान
- Politics News | ठाकरे गटाचे आमदार रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात ; मोठ्या खासदाराचा गौप्यस्फोट
- Aditya Thackeray | “आदित्य ठाकरे कोण?, मला माहिती नाहीत”, म्हणणाऱ्या तानाजी सावंताना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- DY Chandrachud | वडिलांनंतर मुलगा न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी घेतली ५० वे सरन्यायाधीशपदी शपथ