फडणवीस सरकारच्या काळातील वृक्षलागवडीच्या चौकशीचे आदेश

मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातल्या 50 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी शंका उपस्थित केल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी वृक्ष लागवड अभियानात सहभाग घेतला होता.

तसेच वृक्ष लागवड अभियानात एक रोपटं लावताना याचा पुढे वटवृक्ष होईल आणि आमची मैत्री या झाडाप्रमाणेच वाढत जाईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यत्त केली होती. मात्र राजकीय बदलत्या समीकरणांमुळे परिस्थिती आपण बदललेली पाहत आहोत.

Loading...

याचप्रमाणे, वृक्षाच्छादन तसंच रोजगार, उत्पन्न वृद्धीच्या भावनेतून फडणवीस सरकारने तीन वर्षांपूर्वी वनेतर क्षेत्रातही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. फडणवीस सरकारच्या काळात 50 कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर दरवर्षी साधारणत: १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या अभियानातून अपेक्षित काम न झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारमधल्या काही मंत्र्यांनी उपस्थित केली होती. त्यांनी या संदर्भात लेखी पत्रदेखील दिलं.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलं आहे. सरकारनं वृक्ष लागवडीची चौकशी करावी. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीचा आढावा घ्यावा, वृक्ष लागवड हे ईश्वरीय कार्य असून ते पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आम्ही या अभियानात अत्यंत गांभीर्यपूर्वक काम केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती