नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय नाट्य संपण्याचे नाव घेत नाही आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यापासून उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होत आहे. आधी उद्धव ठाकरेंचे ४० आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बंडखोर झाले, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना लोकसभेत देखील धक्का बसला. शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन सभागृहात पक्षनेता देखील बदलला. दरम्यान शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. आमदारांप्रमाणे १२ खासदारांना देखील अपात्र करण्यासाठी शिवसेनेने लोकसभा अध्यक्षांकडे याचिका केली. त्यामुळे हे प्रकरण देखील न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
लोकसभा अध्यक्षांच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात शिवसेना खासदार न्यायालयात-
यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला शिवसेना खासदारांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि राजन विचारे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सभापतींनी बेकायदेशीरपणे आणि एकतर्फी निर्णय घेत पदावरून हटवल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटातील शिवसेना खासदारांनी केला आहे. लोकसभेतील शिवसेना पक्षनेतेपदी राहुल शेवाळे यांची आणि शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी शिवसेना खासदारांनी केली आहे.
18 जुलै रोजी ठाकरे गटातील 12 खासदारांनी बंडखोरी केल्याचे वृत्त आल्यानंतर शिवसेनेचे सभागृह नेते विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सांगितले की, ते शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे विधिवत नियुक्त नेते आहेत आणि राजन विचारे हे मुख्य प्रतोद आहेत. शिंदे यांनी गटबाजीतून नवीन नेता किंवा मुख्य प्रतोद नेमण्याची मागणी केल्यास त्यांची विनंती मान्य करू नये, असे त्यांनी सभापतींना सांगितले होते. मात्र या मागणीचा विचार लोकसभा अध्यक्षांनी केला नसल्याचा आरोप शिवसेना खासदारांनी केला आहे.
त्यानंतर, एका दिवसानंतर शिंदे गटाच्या 12 खासदारांनी सभापतींची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना सभागृहात शिवसेना पक्षनेते म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी सभापतींना केली. यानंतर सभापतींनी विनायक राऊत यांची पक्षनेतेपदावरून तर राजन विचारे यांची मुख्य प्रतोदपदावरून हकालपट्टी केली होती. हा निर्णय शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena MP | शिवसेना खासदारांची लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव! शिंदेंना घेरण्याची तयारी
- Mamata Banerjee | पार्थ चॅटर्जींना मंत्रिपदावरून हटवले; ईडीच्या कारवाईनंतर ममता बॅनर्जींनी घेतला निर्णय
- Shivsena: सुषमा अंधारेंची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा
- Obc Reservation | 365 ठिकाणी OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया
- Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश, मिळाली उपनेतेपदाची जबाबदारी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<