उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या आदर्शांचा विसर; भाजप नेत्याचा घणाघात

balasaheb and uddhav thakre

मुंबई : राज्य सरकारने मंदिरं खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत मागील रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाला आहे. मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पात्र लिहून प्रार्थनास्थळे खुली करण्यावरून खडेबोल सुनावले होते.

यानंतर, सुरु झालेला कोश्यारी -ठाकरे वाद अजूनही शमलेला नसतानाच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमन्त्रो उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा खरमरीत टीका केली आहे. ‘आधी मंदिर मग सरकार अशा वल्गना करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुखांच्या आदर्शांचा विसर पडल्याने त्यांनी आधी बार आणि रेस्टॉरंट उघडली आहेत पण मंदिरे मात्र बंदच ठेवली आहेत.’ असा घणाघात भातखळकरांनी केला आहे.

मंदिरं खुली करण्याबाबत काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

अजूनही मंदिर खुले करण्याबाबत सरकारने पावले उचलले नसल्याने भाजपने महाविकास आघाडीवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थिती, मुंबई लोकल, प्रार्थनास्थळे सुरु करण्यावर भाष्य केलं. ‘गणपती होऊन गेले, नवरात्र, दिवाळी येत आहे. त्यामुळे मी मंदिर खुली करण्याबाबत हळुवार पणाने जात आहे. काही जणं म्हणतात हे उघडलं ते का नाही? जबाबदारी आमच्यावर आहे आणि त्याहून जास्त जनतेवर प्रेम आहे. त्यामुळे तंगड्यात तंगडं घालून सर्व बंद ठेवण्याची मानसिकता आमची नाही. त्यामुळे येत्या सर्वधर्मांच्या सणात आपल्याला खूप काळजीपूर्वक राहावं लागणार आहे’ असं सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला होता.

महत्वाच्या बातम्या-