उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांशी भेट नाकारली

uddhav

मुंबई : अहमदनगरमध्ये शिवसैनिकांचं झालेलं दुहेरी हत्यांकाड, नाणार प्रकल्पाला वाढता विरोध या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी वेळ दिली नाही.उद्धव ठाकरेंनी भेट नाकारल्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा लांबणीवर पडली आहे.

याआधीच शिवसेनेनं भविष्यात भाजपशी कुठलीही युती करणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होतेय याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं दरम्यान,भाजपनं आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही, अस वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपनं सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न केले आहेत, मात्र शिवसेनेकडून स्वबळाची भाषा वापरत भाजपला डिवचण्यात येत आहे. शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे, आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा दावा देखील काल संजय राऊत यांनी केला आहे.

बलात्कार, जातीयद्वेष यामुळे देशात आणि राज्यात निर्माण झालेलं एकंदरीत वातावरण हे भ्रमनिरास करणारं असल्याचं सांगत; त्यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय, जिथे पक्षाचा स्वाभिमान दुखावला जाईल, ती पदं आपण स्वीकारणार नसल्याचं सांगत संजय राऊत यांनी राज्यसभा उपसभापतीपदाच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला..Loading…
Loading...