मुंबई : गेले चार दिवस राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. शिंदे गटाचं संख्याबळ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आज उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन सवांद साधला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी जिल्हा आणि तालुकाप्रमुखांशी संवाद साधला. मला सत्तेचा लोभ नाही आणि कशाचाच मोह नाही. वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय. पण जिद्द कायम आहे. मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की, सोबतचे असे वागतील. यापुढे माझं नाव, माझा फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरत जगून दाखवा, तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचं पाप झालंय, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
तसेच जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं? झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, पण तुम्ही झाडाची मुळं नेऊ शकत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर घणाघाती टीका केलीये. तसेच पुढे कोरोनामुळे डोळ्यात पाणी ते अश्रू नव्हते. मी बरा होऊ नेये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. मला वाटलं सीएम पदाची खुर्ची हलतेय. पण ते मानेचं दुखणं होतं. शरीराचे काही भाग बंद पडत होते, त्यामुळे दोन वेळा ऑपरेशन करण्याची वेळ आली होती. मी अजून जिद्द सोडली नाही, जिद्द अजून कायम आहे, असं देखील ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या: