मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे महाविकास आघाडी पुढे मोठे संकट उभे राहिले आहे. आज उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन सवांद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की, सोबतचे असे वागतील, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले. भाजपसोबत जायला पाहिजे म्हणून काहींचा दबाव आहे पण मी शांत आहे. संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊनही मी त्यांना सांभाळलं. काहींनी मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तसेच जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं? झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, पण तुम्ही झाडाची मुळं नेऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मला सत्तेचा लोभ नाही. मी वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय पण जिद्द कायम आहे. आणि आत्ताही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. मला वाटलं सीएम पदाची खुर्ची हलतेय पण ते मानेचं दुखणं होतं. शरीराचे काही भाग बंद पडत होते, त्यामुळे दोन वेळा ऑपरेशन करण्याची वेळ आली होती. मात्र मी अजून जिद्द सोडली नाही, जिद्द अजूनही कायम आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहेत.
महत्वाच्या बातम्या: