वसंतदादांच्या पाठीत वार करून पवार स्वतः मुख्यमंत्री झाले : उद्धव ठाकरे

udhav thakre

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता सुरवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय व्यासपीठावरून चांगलीचं जुंपत आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करत टीका केली आहे. शरद पवार यांना सरकार घालवण्याचा अनुभव आहे. कारण स्वतःच्याच पक्षातील नेत्याच्या पाठीत वार करून पवार स्वतः मुख्यमंत्री झाले होते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पवारांवर टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी वैजापूर येथे प्रचारसभा घेतली यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, शरद पवारांबाबत आमची इच्छा आहे तुम्ही कधीच स्वस्थ बसू नका. कारण सरकार कधी जाणारच नाही. शरद पवारांना सरकार घालवण्याचा अनुभव आहे. स्वतःच्या पक्षाचे वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले. तसेच मी बोलण्यासाठी नाही आलेलो मी सरकार आणून काम करण्यासाठी आलेलो आहेत. काही बोलघेवडे लोक आघाडी सोबत फिरत आहे त्यांना करू द्या. आम्हाला काहीतरी घ्यायचे म्हणून नाही तर काहीतरी द्यायचं म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत, असे ठाकरे म्हणाले.

आज संपूर्ण महाराष्ट्र प्रमुख राजकीय नेत्यांनी ढवळून काढला आहे. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा, शरद पवार या प्रमुख नेत्यांनी आज अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत विधानसभा निवडणुकीच्या संग्रामाला सुरवात केली आहे. तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही मुंबईतून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे या निवडणुकीत कोणत्या मुद्यांना हात घालणार आहेत, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या