Share

Uddhav Thackeray | “खोके सरकार जेंव्हापासुन खुर्चीवर बसलंय तेंव्हापासुन…”; उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर बोचरी टीका

Uddhav Thackeray | बुलढाणा : बुलढाण्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या वतीने शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला  आहे.

“हे खोके सरकार जेंव्हापासुन खुर्चीवर बसले तेंव्हापासुन महाराष्ट्राला पनवती लागली आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे  सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. “1 जुलै पासुन हजारच्या आसपास शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. कशाचे नवस फेडताय?”, असा सवाल त्यांनी केला आहे.

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होत. यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला खोचक सवाल केला आहे. “मी मुख्यमंत्री असताना महिलांचा अपमान करणार्‍यांना हाकलल होतं. तुम्हीं काय केलत?” असा सवाल त्यांनी केलाय. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तारांचा उल्लेख अब्दुल गटार असा केलाय.

यावेळी ठाकरे म्हणाले, काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यांच्याच मंत्र्याने म्हटले आमचे ४० रेडे तिकडे गेले. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले होते. नंतर अयोध्येला गेलो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवण्यासाठी गेले होते. ज्याचे भविष्य त्यांना माहीत नाही ते आपले भविष्य ठरवणार. तुमचे भविष्य ज्योतिषाला दाखवून उपयोग नाही. तुमचे भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत आहेत, अशा टोला ठाकरे यांनी लगावला.

महत्वाच्या  बातम्या :

Uddhav Thackeray | बुलढाणा : बुलढाण्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या वतीने शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now