ते दिवस आता विसरा, उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

टीम महाराष्ट्र देशा;- विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे विधान काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते.त्यांच्या याच विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे .

ठाकरे म्हणाले शरद पवार यांनी वसंतदादांचे सरकार पाडले होते. त्यांचा सरकार पाडण्याचा, घालवण्याचा अनुभव दांडगा आहे. ते दिवस आता विसरा, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी यांनी शरद पवार यांना लागवला आहे. आता ही निवडणूक जनतेनेच आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे पवारांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे ही ते म्हणाले.ते जालना येथे सभेत बोलत होते.

तसेच राज्यात भगवा फडकवण्यासाठीच भाजपसोबत युती केली आहे, युती करण्याचा हेतू स्पष्ट आणि स्वच्छ होता. यात ज्या-ज्या ठिकाणी जागा राहून गेल्या त्या-त्या ठिकाणच्या इच्छुकांची माफी मागतो असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांकडून सभांचे आयोजन केले जात आहे. तसेच आपण केलेल्या कामाची पोचपावती पोहचविण्यासाठी नेते मंडली चांगलेच सक्रीय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.

महत्वाच्या बातम्या