मोदींकडून राहुल गांधींवर करण्यात येणारी टीका म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’चा प्रकार

मुंबई –  काँग्रेस पक्षाला २०१९ मध्ये यश मिळाले तर आपल्याला पंतप्रधान व्हायला आवडेल असं वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. दरम्यान भाजपकडून राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठवण्यात येतीये. या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता.

एका बाजूला निवडणुका एकत्र लढण्यासाठी महाआघाडी करायची व दुसऱ्या बाजूला आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा न करता परस्पर पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर करायची हे म्हणजे आघाडीतील इतर पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच आहे अशी टीका नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली होती.

दरम्यान शिवसेनेचं मुखपत्र असलेल्यमधून मोदींच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेण्यात आलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर करण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका करणे म्हणजे हा प्रकार ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ थाटाचा आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. तसेच मोदींना आता का होत नाही पण आघाडी, युतीच धर्म आठवला याचा आम्हाला आनंद आहे अशी खोचक टीका देखील करण्यात आली आहे.दरम्यान या संपादकीय लेखातून राहुल गांधीच कौतुक करताना त्यांच्यामध्ये पंतप्रधान बनण्याची क्षमता असल्याचं म्हंटल आहे.

Gadgil