Share

Uddhav Thackeray | “हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व…”; पुण्यातील ‘त्या’ प्रकारावरुन ठाकरेंनी शिंदे गटाला सुनावलं

Uddhav Thackeray | मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राज्यात एक नवीन वाद पेटलेला आहे. “तुरुंगात असताना भीतीपोटी माफीनाम्यावर स्वाक्षरी करून सावरकरांनी ब्रिटीशांना मदत केली आणि महात्मा गांधी आणि इतर समकालीन भारतीय नेत्यांचा विश्वासघात केला”, असा दावा राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी केला.

त्यांच्या या विधानानंतर गुरुवारी पुण्यातील सारसबागेसमोरील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं. या आंदोलनातील बॅनरवर एका बाजूला राहुल गांधी यांचा लाल फुल्ली मारलेला आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो होता. घोषणाबाजीच्या या गोंधळात एक महिला चुकून राहुल गांधींच्या ऐवजी सावरकरांच्या फोटोला जोडे उगारत असल्याचं एका कार्यकर्त्याच्या लक्षात आलं. त्याने तिची चूक दाखवून दिली त्यामुळे ही महिला वेळीच थांबली.

मात्र आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावर ठाकरे गटाकडून शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. भाजपा आणि शिंदे गट हे ‘नकली हिंदुत्ववादी’ असल्याचं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे. या अग्रलेखामध्ये पुण्यातील आंदोलनामध्ये घडलेल्या प्रकारावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने शिंदे गटाची थेट अक्कलच काढली आहे.

नेमकं काय म्हटलंय सामनात? 

“सावरकरांच्या हिंदू महासभेवर तर या लोकांनी आगपाखडच केली. त्यामुळे सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत. मिंधे गटाचे लोक तर राहुल गांधी समजून वीर सावरकरांनाच रस्त्यावर जोडे मारीत आहेत. असे हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि सावरकरांचे विचार समजवायला निघाले आहेत,” अशी टीका सामनाच्या लेखातून करण्यात आली आहे.

“राहुल गांधी व त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मिंधे गटाचे लोक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले. मात्र पुण्यात या लोकांनी राहुल गांधींना सोडून सावरकरांनाच जोडे मारल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला व त्याचा निषेध केला पाहिजे, पण निषेध करण्यासाठी ज्यांना रस्त्यावर उतरवले त्यांना राहुल व सावरकर यांच्यातला फरक कळला नाही, असा एकंदरीत हिंदुत्वाचा गोंधळ सरकारात उडालेला दिसतोय,” असं म्हणत ठाकरे गटाने शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Uddhav Thackeray | मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राज्यात एक नवीन …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now