मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बंड करत शिवसेनेला सुरुंग लावला. त्यानंतर कोसळलेली शिवसेना या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी काम सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज जळगाव आणि वाशिम भागातून काही शिवसैनिक आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर आले होते. त्यावेळी त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर शाब्दिक वार केले आहेत.
“काल नागपंचमी झाली. ते बोलतात ना की नागाला कितीही दूध पाजलं तरी तो आपल्यालाच चावतो. तसंच आपण या सर्वांना प्रेमाने, मायेने निष्ठेचं दूध पाजलं होत, पण तरीही औलाद गद्दारच निघाली”, अशी झणझणीत टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातली बंडखोरांवर केली. पुढे बोलताना ते असेही म्हणाले कि, “आपली लढाई सध्या दोन-तीन पातळ्यांवर सुरु आहे. एक लढाई ही कोर्टात सुरु आहे. पण दुसरी लढाई आहे कागदांची. या लढाईत आपल्याला जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांची शपथपत्र घ्यायची आहेत. तसेच जास्तीत जास्त प्रमाणात सदस्य नोंदणी करायची आहे. त्यामुळे ते कुणीही अर्ध्यात सोडू नका”. तसेच जळगावमध्ये भाजपानं गुलाब पाहिला आहे पण त्यांना आता सैनिकांचे काटे बघायला मिळतील, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.
शिवसेनेच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, “जर दोन तृतीयांश आमदारांना वेगळे व्हायचे असेल तर त्यांना कोणात तरी विलीन व्हावे लागेल किंवा नवा पक्ष स्थापन करावा लागेल. ते शिवसेना मूळ पक्ष आहे असे तो म्हणू शकत नाही. सिब्बल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्ही म्हणत आहात की त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हायला हवे होते किंवा वेगळा पक्ष काढायला हवा होता. शिंदे गटाने हे कायदेशीरपणे करायला हवे होते, असे सिब्बल म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, पक्ष हा केवळ आमदारांचा गट नाही. या लोकांना पक्षाच्या बैठकीत बोलावण्यात आले होते. तो आला नाही. उपसभापतींना पत्र लिहिले. त्याचा व्हीप नेमला. खरे तर या लोकांनी पक्ष सोडला आहे. तो मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकत नाही. आजही शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत. ते पुढे म्हणाले की जेव्हा 10वी अनुसूची (पक्षांतरविरोधी तरतूद) घटनेत जोडली गेली तेव्हा त्याचा काही उद्देश होता. असा गैरवापर होऊ दिला तर बहुसंख्य आमदार चुकीच्या पद्धतीने सरकार पाडून सत्ता मिळवत राहतील आणि पक्षावर दावाही करतील.
महत्वाच्या बातम्या :
- Patra Chawl Scam | संजय राऊतांनी अलिबागमध्ये 3 कोटींना 10 प्लॉट खरेदी केले, ED च्या आरोपाने खळबळ
- Ajit pawar | अजित पवार यांच्यासह शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन
- Uday Samant | “आम्ही आमच्या मतदार संघात फोन केले तर…” ; उदय सामंत यांचा इशारा
- Nina Gupta | “अभिनेत्यांना फक्त तरुण अभिनेत्रींसोबत काम करायचंय”; नीना गुप्तांचं बोल्ड विधान चर्चेत
- Taiwan | जाणून घ्या… तैवानचा इतिहास आणि तेथील वैशिष्ट्ये
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<