Uddhav Thackeray । मुंबई : पत्राचाळ (Patrachawl Scam) घोटाळ्या प्रकरणी तब्बल १०२ दिवस अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा अखेर जामीन झाला आहे. मोठ्या जल्लोषात संजय राऊतांचा जामीन साजरा करण्यात आला. यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचक इशारा दिला आहे.
“दिवस सतत बदलत असतात. तेही त्यात आहे. याचा अर्थ त्यांनी लक्षात ठेवला पाहिजे”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता दिला. तसेच यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचं कौतुक केलं. संजयने न डरता जिंकू शकतो हे दाखवून दिलं आहे. त्याने देशासमोर उदाहरण दिलं असल्याचं ठाकरे म्हणालेत.
ते म्हणाले, या तपास यंत्रणांच्या विरोधात आपचे लोकंही लढत आहेत. तेलंगणाच्या लोकांनी व्हिडीओच्या माध्यमातून प्रकरणच बाहेर आणलं आहे. सोरेन आणि ममता दीदींना छळलं जात आहे. हे सर्व एकत्र झाले तर किती मोठी ताकद उभी राहील, याची ताकद त्यांना माहीत नाही, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे.
पुढे ते म्हणाले, मी न्यायदेवतेचे आभार मानतो, निकालपत्रात स्पष्टपणे काही निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्याच्या अंगावर जा सांगत आहेत, त्याच्या अंगावर जात आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केलीय.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs ENG T20 WC | केएल राहुल फ्लॉप, रोहित-विराटचा पलटवार, पॉवरप्लेमध्ये ३८ धावा
- IND vs ENG T20 WC | केएल राहुल पुन्हा फ्लॉप, सेमीफायनलमध्ये 5 धावा करून बाद, भारताला पहिला धक्का
- T20 World Cup | मॅच आधीच टीम इंग्लंडला झटका, मार्क वूडच्या जागी खेळणार ‘हा’ गोलंदाज
- Sanjay Raut | “राज्य उपमुख्यमंत्री चालवतात, बाकीचे गुंडळतात”, फडणवीसांवर संजय राऊतांचा कौतुकाचा वर्षाव
- Sanjay Raut | भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा संजय राऊतांना दिल्लीहून फोन, राऊतांनी दिली माहिती