Uddhav Thackeray | मुंबई : तीन-चार दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बीड (Beed) जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांना अब्दुल सत्तारांनी “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. यावरून अब्दुल सत्तारांवर विरोधी पक्षनेत्यांनी अनेक टीका केल्या. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या सगळ्यावरून शिंदे गटातील नेत्यांवर सामना (Saamana) अग्रलेखातून निशाणा साधला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
शेती मंत्री अब्दुल सत्तार यांनी तर बीडच्या कलेक्टरला भर बैठकीत विचारले, ‘‘आपण दारू वगैरे पिता की नाही?’’ कलेक्टर यांनी सांगितले, ‘‘होय, आम्ही पितो अधूनमधून.’’ यावर सत्तारांच्या मागून कुणी तरी जिभेची टाळी वाजवली- ‘‘आमचे साहेब दारू पित नाहीत, पण खोके घेतात!’’ असा एकंदरीत महाराष्ट्राच्या इज्जतीचा खेळखंडोबा जागोजाग सुरू आहे. राज्याच्या प्रश्नांवर ना मुख्यमंत्री बोलतात ना त्यांचे वाचाळ मंत्री, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून शिंदे गटातील नेत्यांवर चांगलंच टीकास्त्र सोडलं आहे.
तसेच, मिंधे-फडणवीसांच्या सरकारने प्लॅस्टिक बंदीप्रमाणे उद्या राज्यात खोकेबंदी केली तरी आश्चर्य वाटायला नको, कारण कोणतेही खोके दिसले की लोकांना पन्नास बेइमान आमदारांचीच आठवण होणार. या बेइमानांच्या राजकीय चिताही खोके रचून पेटविल्या जातील असा संताप लोकांत खदखदत आहे.
आज तुम्ही एका राणांना समजावले, पण अमरावती व राज्याच्या जनतेला कसे समजावणार? आणि किती लोकांवर बदनामीचे खटले दाखल करणार? ‘खोक्यांचा आरोप मी कदापि सहन करणार नाही’, असे बच्चू कडू यांनी तळमळून सांगितले. कडू यांनी अपंगांसाठी आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले, पण एकदा गुवाहटीला गेल्याने त्या कामावर बदनामीचे ‘खोके’ पडले, असल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | शरद पवारांच्या तब्येतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या…
- Bachhu Kadu । “मरण्यासाठी तयार राहतो, कोणत्या चौकात येऊ ते…”; राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचं प्रत्युत्तर
- Sambhaji Bhide | महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; “आधी कुंकू लाव, मगच…”
- Ravi Rana । “दम दिला तर घरात घुसून…”; बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्यावर रवी राणांचा पलटवार
- Aravind Sawant | अरविंद सावंतांचा शिंदे गटावर निशाणा; म्हणाले, “चाळीस आमदारांना गाडण्यासाठी…”