मुंबई : गेले एक-दीड महिन्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटाची दसरा मेळाव्यासाठीची तयारी सुरू होती. काल अखेर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवाजी पार्कवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. त्यावेळी ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.यातच ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वंयसंचालचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी एक वक्तव्य केलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
मोहन भागवतांबद्दल मला आदर आहे. अलिकडच्या काळात मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिली. मोहन भागवतांनी हिंदूत्व सोडलं, की मिंदे गटाने नमाज पडायला सुरूवात केली. कशासाठी तर, संवाद साधण्यासाठी मोहन भागवत तिथे गेले होते. तिथे गेल्यावर मुस्लिमांनी सांगितलं, मोहन भागवत ‘राष्ट्रपिता’ आहेत. आम्ही तर त्यांना ‘राष्ट्रपती’ करण्याची मागणी केली होती, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.
तसेच,मोहन भागवतांनी मुस्लिमांबरोबर बोललं, तर त्यांचं राष्ट्रीय कार्य सुरु आहे. आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदूत्व सोडलं. कुठले धागेदोरे कुठे लावतात, कसला आभास निर्माण करतात. त्याचबरोबर महिला आणि पुरुषांत समानता असल्याचं मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांची तिच शिकवण आहे. आम्ही सुद्धा मातृभक्त, पितृभक्तच आहोत, असं ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी मोहन भागवत यांनी‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासींची मशिदीत भेट घेतली. त्यापूर्वी मोहन भागवत यांनी अन्य मुस्लिम नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या. यावरून उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर भाष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- Eknath Shinde | “कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता” ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू असताना अर्ध्याहून अधिक लोक निघून गेले
- Uddhav Thackeray । महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा घेतला खरपूस समाचार! भाषणातील महत्वाचे मुद्दे वाचा…
- Eknath Shinde | “तुम्ही तर बापालाच विकण्याचा प्रयत्न केला…” ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार