Saamana | मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे. यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना, शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. त्याचबरोबर अचानक पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचंही खूप मोठ्या प्रमाणावर नुसकान झालं आहे. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील (जि. हिंगोली ) गारखेडा परिसरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पत्र पाठवून आपले गावच विक्रीस काढले आहे. गावविक्रीचा फलकही गाववाल्यांनी गावात लावला आहे. याचपार्श्वभूमीवर सामना (Saamana) अग्रलेखातून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे.
सामना (Saamana) अग्रलेखात नेमके काय म्हटले आहे
महाराष्ट्रातील शेतकरी पीकपाण्यासह महाप्रलयात वाहून गेला. पोलिसांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) रुसले आहेत. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतंत्रपणे कामे करीत आहेत. एकमेकांवर रोज चिखलफेक करणारे राजकारणी क्रिकेटच्या मैदानात स्नेहभोजनासाठी एकत्र येतात, पण राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांची गावे विकायला काढली. आपल्या राज्यपालांना हे माहीत आहे काय?, असा खोचक सवाल करत सामनामधून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी हल्ला केला आहे.
महाराष्ट्रातील दिवाळी शेतकऱ्यांसाठी बरी नाही. सर्वत्र महाप्रलय आहे आणि शेतकऱ्यांची खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाहून गेली. शेतकरी अडचणीत आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या कुठे भूमिगत झाले आहेत याबाबत कोणी खुलासा करेल काय? मुळात आपले राज्यपाल राजभवनात आहेत की नाहीत, ते गृहमंत्री श्री. फडणवीस यांनी जनतेसमोर आणावे. ‘ठाकरे’ सरकारच्या काळात सध्याच्या राज्यपाल महोदयांची काम करून दमछाक होत होती. पूरस्थितीत स्वतंत्र दौरे काढून प्रशासनास वेगळय़ा सूचना देत होते. इतर अनेक प्रशासकीय कामांत त्यांचा थेट हस्तक्षेप होता. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांचे मन साफ नव्हते व मंत्र्यांना राजभवनावर बोलवून ते सल्ले व सूचना देत होते. महाराष्ट्रातील महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, विद्यापीठांचा कारभार याबाबत ते कमालीचे जागरूक होते.
शिवाजी महाराजांपासून सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत वादग्रस्त विधान करून ते खळबळ माजवीत होते. ते आपले कार्यक्षम राज्यपाल आज कोठे आहेत? त्यांचे ज्ञान, अनुभव यांचे मार्गदर्शन शिंदे, फडणवीसांच्या सरकारला होऊ नये याचे आश्चर्यच वाटते. सत्य असे आहे की, राजभवनाने आता लुडबुड करू नये, निवृत्तीबुवांसारखे राहावे हा राजकीय आदेश राज्यपाल महोदय पाळीत आहेत. राज्यपालांकडे खरोखरच काही काम उरले नसेल तर मुंबईतील भाजप नेत्यांच्या ‘डॉक्टरेट’ पदव्यांच्या चौकशींचे आदेश तरी त्यांनी द्यावेत. एकंदरीत राज्यपाल या दिवाळीत कोणतेही लवंगी फटाके फोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. महाराष्ट्राचा शेतकरी महाप्रलयात गटांगळ्या खातो आहे. त्याची पिके वाहून गेली. त्याला सरकारी मदत मिळालेली नाही. मात्र राज्यपालांनी शेतकऱयांच्या या आक्रोशाची दखल घेतलेली नाही. अर्थात, राज्यपालांनी अशी दखल घ्यायला राज्यात सध्या काय ठाकऱयांचे सरकार सत्तेवर आहे? राज्यपालांची ही दिवाळी तशी थंडच दिसते. राज्यपाल व शिंदे-फडणवीस सरकारच्या माहितीसाठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली एक बातमी देतो व विषय संपवतो.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | “त्यांचे पक्ष तेच बुडवतील…”, चंद्रशेखर बावनकुळेंचा शिवसेना अन् राष्ट्रवादीवर निशाणा
- Eknath Khadse | “मदत करायची नसेल तर..”; एकनाथ खडसेंचा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर हल्ला
- Kishori Pednekar | दिपाली सय्यद यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- Vikram Thackeray | “उद्या ४ वाजता मी…”, देवंद्र भुयार यांच्या ‘त्या’ धमकीला विक्रम ठाकरेंचं आव्हान
- Deepali Sayyad | एकनाथ शिंदेंची भेट घेताच दीपाली सय्यद यांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या…