Share

Uddhav Thackeray | C-295 प्रकल्पावरून ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर हल्ला, म्हणाले…

Uddhav Thackeray |  मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन (Vedant Foxcon) प्रकल्पानंतर आता  C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरात राज्यामध्ये गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागलं आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) प्रकल्प गुजरातला गेल्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला, असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. यासंदर्भात ठाकरे गटाने शिवसेना पक्षाच्या अधिकृत फेसबुक आकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी हे म्हटलं आहे.

टाटा एयरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होते. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजिनामा देणार का?, असा खोचक सवाल करत उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र सोडंलं आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये होणारा C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार आहे. हा प्रकल्प तब्बल 22 हजार कोटींचा असल्याचं समजतं आहे. या प्रकल्पाचे 30 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Uddhav Thackeray |  मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन (Vedant Foxcon) प्रकल्पानंतर आता  C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरात राज्यामध्ये गेला आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now