Share

Uddhav Thackeray | “…त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर हल्ला

मुंबई : आगामी अंधेरी (पूर्व) पोट निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला आणि एकनाथ शिंदे गटाला चिन्ह आणि नाव दिले आहेत.  त्यामध्ये ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाव आणि ‘मशाल’ हे चिन्ह दिलंय. याच पार्श्वभूमीवर उरणमधील शिवसैनिक मशाल घेऊन आज मातोश्री बंगल्यावर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

मी शिवतीर्थावर जे बोललो तेच आज मी इथेही बोलत आहे. ही माझी भावना आहे. शिवसेना 56 वर्षांची झाली आहे. या 56 वर्षांमध्ये शिवसेनेने असे 56 जण पाहिले. मात्र ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर आघात करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामुळे शिवसेना संपली नाही तर त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली आहे, शिवसेना अधिक जोमाने उभी राहिली आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे गटावर हल्ला केला असल्याचं दिसून येतं आहे.

तसेच उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं असलं तरी, ठाकरे गटाच्या अडचणी वाढतंच चालल्या आहेत. मशाल या चिन्हावर बिहारमधील समता पार्टीने अक्षेप घेतला आहे.1994 सालापासून हे राष्ट्रीयकृत चिन्ह आमच्या पक्षाचं असल्याचा दावा पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या तृणेश देवळेकर यांनी केला आहे.

यासंदर्भात पक्षाने निवडणूक आयोगाला ईमेलच्या माध्यमातून माहिती कळवली असून हे चिन्ह आम्हाला देण्यात यावं अशी मागणी केली आहे. इतकेच नाही तर या चिन्हासाठी थेट न्यायालयामध्ये जाण्याचा इशाराही समता पार्टीने दिला असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : आगामी अंधेरी (पूर्व) पोट निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला आणि …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now