गीता वाटण्याएेवजी विद्यापीठाचे निकाल वेळेवर लावा : उद्धव ठाकरे

पुणे : मुंबईतील महाविद्यालयांमध्ये गीता वाटण्याएेवजी विद्यापीठाचे निकाल वेळेवर लावावेत असा टाेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांना लगावला. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भगवदगीता वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपवर हला चढवला.

भगवदगीता मला चाळायची आहे ती नक्की संस्कृतमध्ये आहे की गुजरातीत आहे असा भाजपला तिरकस टोला त्यांनी लगावला. परीक्षा निकाल वेळेवर न लागणे, पेपर फुटी प्रकार हे सगळं झाकण्यासाठी भगवदगीतेचा विषय काढण्यात आला का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. विद्यापीठाचा गोंधळ टाळण्यासाठी भगवदगीता वाटपाचा विषय काढण्यात आला. त्यापेक्षा निकाल वेळेवर लावा असे उद्धव म्हणाले. राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम रद्द करणे हे सगळं व्हायला हवे त्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या ? असाही प्रश्न त्यांनी केला.

भाजपचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला

संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा – राष्ट्रवादी

You might also like
Comments
Loading...