‘सावजाची शिकार मीच करीन’ – उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. ‘सावजाची शिकार मीच करीन. त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही. शिकारीसाठी आता बंदुकीची गरज नाही. सावज दमलंय,’ अशा पद्धतीन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी देशाच्या आणि राज्यांच्या राजकारणावर बोलत असताना भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले. ‘माझ्या खांद्यावर कुणाचीही बंदूक नाही. बंदूक माझ्या हातात आहे. त्यामुळे सावज टप्प्यात आल्यानंतरच बार उडवणार,’ असं सांगतानाच ‘काही वेळा सावजावर गोळी मारण्याची गरजच नसते. ते पळून पळून पण पडू शकतं,’ असा खोचक टोला उद्धव यांनी भाजपला लगावला. तसेच ‘ज्या शिवाजी महाराजांनी कृष्णाने सांगितलेली गीता अंमलात आणली. त्या शिवरायांच्या पुतळ्याची उंची कसली मोजताय?,’ अशी टीका यावेळी त्यांनी केली.

शाळेतील शिक्षकांनाच बंदूका द्या- डोनाल्ड ट्रम्प

व्यंगचित्रकार राज ठाकरे ‘पार्टटाइम’ राजकारणाला आतातरी सिरियसली घेणार का?