‘अयोध्येतच जातोय, बारमध्ये नाही! बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते…आम्ही येतो, आम्ही येतो!’

टीम महाराष्ट्र देशा- आम्ही अयोध्येत जाणार म्हटल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात मुरडा आला. अयोध्येतच जातोय, बारमध्ये नाही! बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते… आम्ही येतो, आम्ही येतो! अडगळीत गेलेल्या लोकांनी आम्हाला शिकवू नये, तुमचे बारा वाजलेत, तुमचा मोडकळीला आलेला पक्ष अगोदर सांभाळा, असे खडे बोल यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सुनावले. दुष्काळ आहे. महाराष्ट्रातली धरणे, तलाव कोरडे पडलेत. अजित पवारांना फिरकू देऊ नका! असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

औरंगाबाद , बीड व लातूर येथे नुकतेच शिवसेना गटप्रमुखांचे मेळावे झाले. या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला .

निवडणूक आली म्हणून शिवसेनेला राममंदिराची आठवण झाली असे कुणीतरी म्हणाले. आमचे दैवत एकच, शिवसेनाप्रमुख! यांनी आतापर्यंत किती दैवते बदलली? दैवत बदलणारी अवलाद तुमची! तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचा पाठ शिकवू नये, तो आमच्या रक्तात आहे, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भ़ुजबळ यांना सुनावले. आणि तुमच्यापेक्षा रामाची आठवण बरी, असे ते म्हणाले. जामिनावर सुटले, पण जमिनीवर आले नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भुजबळांना नाव न घेता लगावला.

उद्धव ठाकरेंचा आयोध्या दौरा : खा. संजय राऊत यांनी राम मंदिर परिसराला दिली भेट