देशातील न्यायसंस्था मुकी-बहिरी असावी, असे प्रयत्न करण्यात येत आहेत-उद्धव ठाकरे

केवळ निवडणुका जिंकणे म्हणजे देशाचा कारभार चालवणे नव्हे-ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- केवळ निवडणुका जिंकणे म्हणजे देशाचा कारभार चालवणे नव्हे असा भाजपला टोला लगावत देशातील न्यायसंस्था मुकी-बहिरी असावी, असे प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे .सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धती गेल्या दोन महिन्यांत बिघडल्याचा आरोप करत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तीनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाष्य केले.

bagdure

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

सर्वोच्च न्यायालयातील कारभारातील दोष जगजाहीर करणाऱ्या त्या चार न्यायमूर्तीच्या धाडसाचे कौतुक वाटते, देशातील न्यायसंस्था मुकी-बहिरी असावी असे प्रयत्न करण्यात येत आहेत. केवळ निवडणुका जिंकणे म्हणजे देशाचा कारभार चालवणे नव्हे. चार न्यायमूर्तीना आपले प्रश्न मांडण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागते हे धक्कादायक आहे. आता न्यायसंस्थेवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.या चार न्यायमूर्तीवर आता कारवाई होईल अशी दाट शक्यता आहे. मात्र ती आकसाने होऊ नये. त्याचबरोबर केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

You might also like
Comments
Loading...