जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात? उद्धव ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा:- राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराने आता जोर धरला आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी प्रचारसभाचं आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमधील उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ प्रचारसभा पार पडली .

यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, ईडी चौकशीला सामोर जाणाऱ्यांना ईडीने सांगितले गरज असेल त्यावेळी बोलवलं जाईल. त्यावेळी आला नाही तर उचलून आणलं जाईल असं ईडीने सांगितले असल्याचे म्हणत, ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर हल्लाबोल केला.

तसेच यावेळी सेनेच्या जाहीरनाम्यात 10 रुपयांना जेवण देण्याच्या घोषणा केली त्याची अनेकजण चेष्टा करत असल्याचे म्हणत पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात? गरिबांसाठी 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट? याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार पाणी देतील ते पाणी आपल्याला चालेल का? असा सवाल सुद्धा उपस्थितांना केला.

दरम्यान, स्वतंत्रपूर्व काळातील काँग्रेसकडे विचार होता आता तसा विचार त्यांच्या पक्षांमध्ये नाही.त्यांच्याकडे आता कोणी नेताचं उरला नाही. तुम्ही गरिबांचा पैसा खाणार आणि तुम्हाला विचारायचे पण नाही का? ईडी समोर जाणाऱ्यांना ईडीने सांगितले गरज असेल त्यावेळी बोलवलं जाईल. त्यावेळी आला नाही तर उचलून आणलं जाईल असं ईडी म्हणाली असल्याचे ठाकरे यानी सांगितले.

महत्वाच्या बातम्या