‘नोटाबंदीमुळे उद्धव ठाकरे कॅशलेस’ भाजप आमदाराची उद्धव ठाकरेंवर टिका

udhav thackeray on bjp

टीम महाराष्ट्र देशा: उद्धव ठाकरे यांनी आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर भाजप सरकार आणि सरकारच्या धोरणांवर जोरदार टिका केली , आता या नंतर भाजपच्या गोटातून याला जोरदार उत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांनी नोटाबंदीमुळे उद्धव ठाकरे कॅशलेस झाले आहेत, त्यामुळे नोटाबंदी, जीएसटी या मुद्यांवरून डांगोरा पिटत चालले आहेत, अशी जोरदार टीका केली आहे.

देशाच्या हिताचा विचार डोळय़ांसमोर ठेवून नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा भविष्यात दिसणार आहे. जे कॅशलेस झाले आहेत, ते आज ओरडत सुटले आहेत. मात्र देशातील ९० टक्के जनता नोटाबंदीच्या समर्थनार्थ असल्याचं देखील हाळवणकर म्हणाले

इचलकरंजी भाजपच्या वतीने आमदार हाळवणकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शहर कार्यालयात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते