‘उद्धव ठाकरे औरंगाबादचं संभाजीनगर करूच शकत नाहीत, ते सत्तेच्या प्रेमात आहेत’

uddhav thakrey vs devendra fadnavis

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस आहे. गेले तीन दिवस भाजपने राज्य सरकारवर विविध विषयांवरून हल्लाबोल केला आहे.

भाजपच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा पुनरुच्चार देखील केला आहे. गेले काही महिने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर असं करावं या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने हा मुद्दा तापल्याच दिसून येत आहे.

दरम्यान, शिवसेना संभाजीनगर असं नामकरण करण्यास आग्रही असली तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या किमान कार्यक्रमावर आधारित आहे, त्यात नामकरणाचा अजेंडा नसून विकासाला प्राधान्य दिलं जाईल, असं भाष्य करत काँग्रेसने नामकरणाला विरोध केला होता. आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ‘होय, आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करणारच’ अशी गर्जना केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र सोडून पंजाब, हरियाणा, दिल्ली, काश्मीर, साऊथ, चीन, पाकिस्तान अशा सर्व ठिकाणी गेले. मात्र त्यांनी महाराष्ट्रातील समस्यांवर, जनतेच्या प्रश्नावर काहीच भाष्य केलं नाही. उद्धव ठाकरे औरंगाबादचं संभाजीनगर करूच शकत नाहीत. माझं त्यांना खुलं आव्हान आहे, कारण ते सत्तेच्या प्रेमात आहेत,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP