उद्धव ठाकरेंचा केजरीवालांना फोन; ‘जे घडतं आहे, ते लोकशाहीसाठी चांगलं नाही’

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचाशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. केजरीवाल गेल्या काहीदिवासंपासून दिल्लीचे नायब राज्यपालांच्या कार्यालयात आंदोलन करत आहेत.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सुद्धा अरविंद केजरीवाल यांना पाठींबा दिला आहे.

संजय राऊत म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केजरीवालांसोबत चर्चा केली आहे. दिल्लीच्या जनतेनं केजरीवालांना निवडून दिलं आहे. दिल्लीसाठी काम करण्याचा अधिकार त्यांना जनतेनं दिला आहे. सरकार लोकशाहीनं निवडून आलं असल्यामुळे त्यांच्यासोबत जे घडतं आहे, ते लोकशाहीसाठी चांगलं नाही”

You might also like
Comments
Loading...