fbpx

अमित शाह यांच्या वक्तव्याने युतीतील तणाव वाढला,शिवसेनेने बोलावली तातडीची बैठक

टीम महाराष्ट्र देशा : काल भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केलेल्या युतीसंदर्भातील वक्तव्याने युतीतील तणाव आणखी वाढला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या युतीच्या वक्तव्यावर शिवसेनेने देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

‘वन प्लस वन टू नही होता, युती होगी तो साथी को जितायेंगे नही हुई तो पटक देंगे’, असं वक्तव्य शाह यांनी केलं होत. यानंतर येऊ दया अंगावर, होऊ दया सामना असं म्हणत शिवसेनेने भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी एकमेकांना थेट आव्हान दिल्याने युतीत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीत अमित शहांच्या वक्तव्यावर तसेच आगामी रणनीतीसंदर्भात गांभीर्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. तसच याच बैठकीत युतीच्या भवितव्याचा फैसलाही होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.