मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण मात्र पूर्णपणे अस्थिर झालं आहे. यावर्षी शिवसेनेचे मुबंईत दोन दसरा मेळावे पार पडले. त्यामुळे राजकीय वातावरण हाय होल्टेज झाल होत. यानंतर काल दिवसभर देखील याच मेळाव्यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील आरोप प्रत्यारोप दसरा मेळाव्यात शिगेला पोहोचले होते. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून शिंदे गटावर कडाडून टीका केली. यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांणी उद्धव ठाकरेंच्या सभेचा खरपूस समाचार घेतला आहे.
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राणे यांनी ठाकरेंच्या एकेरी भाषेत उल्लेख करुन भाजपवर केलेल्या टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. राणे म्हणाले कि, आमच्या नेत्यांना काही बोललेलं खपवून घेणार नाही. देशाची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करु नका. काही झालं तरी उद्धव ठाकरे जबाबदार असतील. थोडी तरी मर्यादा ठेवा. तुम्ही मंत्रालयात येऊ शकत नाही. वीस मिनिटे हा माणूस चालू शकत नाही. त्याला सतत डॉक्टरांचा सल्ला लागतो. अशा एकेरी शब्दांत राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
या सभेत काय वक्ते होते. तुम्ही कीती खाली गेलात हे दाखवून द्यायची गरजच उरली नाही. बाळासाहेब शिवसैनिकांना साभाळून घ्यायचे. मात्र उद्धव ठाकरे हे कपटी माणूस असून लबाड लांडगा आहे. शिवसेना सोडल्यावर मला मारण्याची सुपारी छोटा शकील, छोटा राजन टोळीला उद्धव ठाकरेंनी दिली होती, असा गंभीर आरोपही राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
तसेच पुढे बोलताना राणे म्हणाले कि, 2019 च्या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली. ती जिंकली. आणि आता मोदींवर टीका सुरु केली आहे. या माणसानं हिंदूत्वाबद्दल काहीही बोलू नये. त्याचे बेगडी हिंदूत्व आहे. मोदींचे नाव सांगून त्यानं आमदार निवडून आणले. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे, अशा शब्दांत नारायण राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे हे अपघाताने मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी इतक्या दिवस मराठी माणसासाठी काय केलं हे झालेल्या दसरा मेळाव्यात सांगायला हवं होत. मात्र सांगायला अस काहीच नाही. ‘शिवतीर्था’वर विरळ माणस उभे केले होती. उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिल्यावर माणस बाहेर जात होते. यावरून त्यांनी आपली काय पात्रता ते समजून घ्यावं”, असा टोला राणेंनी ठाकरेंना लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- evendra Fadanvis | उद्धव ठाकरेंनी आपले शब्द मागे घ्यावेत, जाहीर माफी मागावी-देवेंद्र फडणवीस
- Travel Guide | ‘हे’ 5 हिंदी भाषिक देश फिरण्यासाठी ठरतील सर्वोत्तम ठिकाणं
- Narayan Rane । उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील मेळावा म्हणजे तमाशाकारांचा मेळावा; नारायण राणेंचा घणाघात
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा पक्षप्रमुखाबरोबरच पक्षाध्यक्षाचाही दावा
- Narayan Rane । “उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे, त्यानं…”; नारायण राणेंची जीभ घसरली